टाळ विणे मृदेंगेसी – संत निळोबाराय अभंग – ४६७
टाळ विणे मृदेंगेसी ।
येती गजरेंसी मिरवत ॥१॥
छबिने पताका गरुडटके ।
घेउनी हरिखें अवलोकिती ॥२॥
म्हणती जन्म सुफळ झाला ।
आजीं देखिला परत्पर ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी ।
लेवूनी अंतरीं सुखावती ॥४॥
टाळ विणे मृदेंगेसी ।
येती गजरेंसी मिरवत ॥१॥
छबिने पताका गरुडटके ।
घेउनी हरिखें अवलोकिती ॥२॥
म्हणती जन्म सुफळ झाला ।
आजीं देखिला परत्पर ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी ।
लेवूनी अंतरीं सुखावती ॥४॥