तमाळशाम रुप मंडित । कटीं मिरवत करांबुजें ॥१॥ पाहतां धणी न पुरे मना । न संडे नयना निजानंद ॥२॥ सर्वहि भूषणें सर्वांगभरी । मनोहरी सुशोभित ॥३॥ निळा म्हणे रुक्मिणी वामीं । त्रैलोक्यस्वामी श्रीविठ्ठल ॥४॥