तमाळशाम रुप मंडित – संत निळोबाराय अभंग – ४६६
तमाळशाम रुप मंडित ।
कटीं मिरवत करांबुजें ॥१॥
पाहतां धणी न पुरे मना ।
न संडे नयना निजानंद ॥२॥
सर्वहि भूषणें सर्वांगभरी ।
मनोहरी सुशोभित ॥३॥
निळा म्हणे रुक्मिणी वामीं ।
त्रैलोक्यस्वामी श्रीविठ्ठल ॥४॥