तापत्रयाचेंहि हरण – संत निळोबाराय अभंग – ४६५
तापत्रयाचेंहि हरण ।
ते हे गोजिरे श्रीचरण ॥१॥
आले पुंडलिकाचिये भेटी ।
ठेले विटेच्या नेहटीं ॥२॥
सकळहि सामुद्रिका ओंळी ।
शोभती उभय पादतळीं ॥३॥
निळा म्हणे ज्यातें ध्याती ।
देवत्रयादि ऋषीपंगती ॥४॥
तापत्रयाचेंहि हरण ।
ते हे गोजिरे श्रीचरण ॥१॥
आले पुंडलिकाचिये भेटी ।
ठेले विटेच्या नेहटीं ॥२॥
सकळहि सामुद्रिका ओंळी ।
शोभती उभय पादतळीं ॥३॥
निळा म्हणे ज्यातें ध्याती ।
देवत्रयादि ऋषीपंगती ॥४॥