अर्चूनियां पुंडलिका । विश्वाव्यापका राहविलें ॥१॥ थोर उपकार केला लोकां । भक्ता भविकां तारियेलें ॥२॥ आणूनियां वैकुंठवासी । सुगुण रुपेंसी भेटविला ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हादिक । देवही सकळिक मानवलें ॥४॥