अर्चूनियां पुंडलिका – संत निळोबाराय अभंग – ४६४
अर्चूनियां पुंडलिका ।
विश्वाव्यापका राहविलें ॥१॥
थोर उपकार केला लोकां ।
भक्ता भविकां तारियेलें ॥२॥
आणूनियां वैकुंठवासी ।
सुगुण रुपेंसी भेटविला ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिक ।
देवही सकळिक मानवलें ॥४॥
अर्चूनियां पुंडलिका ।
विश्वाव्यापका राहविलें ॥१॥
थोर उपकार केला लोकां ।
भक्ता भविकां तारियेलें ॥२॥
आणूनियां वैकुंठवासी ।
सुगुण रुपेंसी भेटविला ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिक ।
देवही सकळिक मानवलें ॥४॥