ध्यान राहिलें मानसीं । सर्वकाळ दिवानिशीं ॥१॥ जेणें धरिले कटीं कर । रुपें सांवळा सुकुमार ॥२॥ न पुरे डोळियांची धणी । कीर्ति ऐकतांहि श्रवणीं ॥३॥ निळा म्हणे लांचावली । वृत्ति तेथेंचि गुंतली ॥४॥