ध्यान राहिलें मानसीं – संत निळोबाराय अभंग – ४६३
ध्यान राहिलें मानसीं ।
सर्वकाळ दिवानिशीं ॥१॥
जेणें धरिले कटीं कर ।
रुपें सांवळा सुकुमार ॥२॥
न पुरे डोळियांची धणी ।
कीर्ति ऐकतांहि श्रवणीं ॥३॥
निळा म्हणे लांचावली ।
वृत्ति तेथेंचि गुंतली ॥४॥
ध्यान राहिलें मानसीं ।
सर्वकाळ दिवानिशीं ॥१॥
जेणें धरिले कटीं कर ।
रुपें सांवळा सुकुमार ॥२॥
न पुरे डोळियांची धणी ।
कीर्ति ऐकतांहि श्रवणीं ॥३॥
निळा म्हणे लांचावली ।
वृत्ति तेथेंचि गुंतली ॥४॥