संत निळोबाराय अभंग

मिरवी अंगीं अवतार – संत निळोबाराय अभंग – ४६१

मिरवी अंगीं अवतार – संत निळोबाराय अभंग – ४६१


मिरवी अंगीं अवतार लेणीं ।
विराजित कीर्ति भूषणीं ।
मुगुट कंडले कोटी तरणीं ।
तैसे तेज बंबाळ ॥१॥
कंठी शोभ्ला कौस्तुभमणि ।
पदकीं चरित्र रत्नाच्या खेवणीं ।
बाहुभूषणें दिव्याभरणीं ।
जडित कंकणेसुशोभित ॥२॥
भक्तस्तवनाच्या सुमनमाळा ।
वेदमर्यादा कटीं मेखळा ।
शास्त्रे वसनें सोनसळा ।
पुराणें ठसे उमटले ॥३॥
शंख चक्र पद्म गदा ।
शोभल्या भुजा त्या सायुधा ।
असुरमर्दनी झळकती सदा ।
मोक्षदानी वैरियां ॥४॥
संतसनकादिक उदरवासी ।
भरला आनंद सावकासी ।
नाभिकमळ प्रजापतीसी ।
ठाव दिधला अखंड ॥५॥
लक्ष्मी अर्धागीं विराजली ।
चरण सेवितां निमग्न झाली ।
तोडर दानवांचा शिसाळीं ।
वामनचरणीं रुळतसे ॥६॥
गगां वामांगुष्ठिहुनी ।
जन्मली उध्दरावया अवनी ।
महादोषांची करीत धुनी ।
चालिली पूर्व समुद्रा ॥७॥
सकळ देवांचे समुदाये ।
सिध्दही येती वंदिती पाये ।
नारद कीर्तनीं उभा ठाये ।
नृत्य करी स्वानंदें ॥८॥
निळा म्हणे उदार ऐसा ।
भक्तचकोरा चंद्रमा जैसा ।
पुंडिलिकाच्या भावासारिसा ।
विटे उभा ठाकला ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मिरवी अंगीं अवतार – संत निळोबाराय अभंग – ४६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *