अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ । थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥ तो हा परमात्मा श्रीहरी । येऊनि इटेवरीं ठाकला ॥२॥ जेणें सागर सप्तामृतीं । भरिले उचंबळती सर्वदा ॥३॥ निळा म्हणे ज्याचेनी रवी । नित्य नवा मिरवी प्रकाश ॥४॥