माथां मोरपिसें कुंडलें गोमटीं । कस्तुरी लल्लाटीं रेखिली दिसे ॥१॥ ह्रदयीं निकेतन श्रीवत्सलांछन । मूर्ती विराजमान शंख चक्र ॥२॥ कटांवरी कर उभा विटेवरीं । भोंवतालें फेरी संतजन ॥३॥ निळा म्हणे तेंचि कळासलें मनीं । देखिलें लोचनी ध्यान जैसें ॥४॥