संत निळोबाराय अभंग

माथां मोरपिसें कुंडलें – संत निळोबाराय अभंग – ४५९

माथां मोरपिसें कुंडलें – संत निळोबाराय अभंग – ४५९

माथां मोरपिसें कुंडलें गोमटीं ।
कस्तुरी लल्लाटीं रेखिली दिसे ॥१॥
ह्रदयीं निकेतन श्रीवत्सलांछन ।
मूर्ती विराजमान शंख चक्र ॥२॥
कटांवरी कर उभा विटेवरीं ।
भोंवतालें फेरी संतजन ॥३॥
निळा म्हणे तेंचि कळासलें मनीं ।
देखिलें लोचनी ध्यान जैसें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माथां मोरपिसें कुंडलें – संत निळोबाराय अभंग – ४५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *