मुगुट कुंडलें वनमाळा – संत निळोबाराय अभंग – ४५८

मुगुट कुंडलें वनमाळा – संत निळोबाराय अभंग – ४५८

मुगुट कुंडलें वनमाळा ।
केशर कस्तुरीचा टिळा ॥१॥
विठो देखिला म्यां दिठीं ।
अंगीं चंदनाची उटी ॥२॥
जडित कंकणें मुद्रिका ।
कांसे पितांबर नेटका ॥३॥
कटीं मेखळा विराजे ।
वाकी किंकणी तोडर गाजे ॥४॥
मुखलावण्याची खाणी ।
जैसा चंद्र पूर्णपणीं ॥५॥
निळा म्हणे कटीं कर ।
अंगकाति मनोहर ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मुगुट कुंडलें वनमाळा – संत निळोबाराय अभंग – ४५८