भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरीच्या ॥१॥ करील तोचि तरणोपावों । दाविल ठावे निजाचा ॥२॥ जेथें वाजतां न लगे वारा । दिशा अंबरा शिवों नेदी ॥३॥ निळा म्हणे ऐसिये घरीं । निजविल वोंवरी पर्यकीं ॥४॥