भवसिंधु तरावया – संत निळोबाराय अभंग – ४५७
भवसिंधु तरावया ।
भजावें राया पंढरीच्या ॥१॥
करील तोचि तरणोपावों ।
दाविल ठावे निजाचा ॥२॥
जेथें वाजतां न लगे वारा ।
दिशा अंबरा शिवों नेदी ॥३॥
निळा म्हणे ऐसिये घरीं ।
निजविल वोंवरी पर्यकीं ॥४॥
भवसिंधु तरावया ।
भजावें राया पंढरीच्या ॥१॥
करील तोचि तरणोपावों ।
दाविल ठावे निजाचा ॥२॥
जेथें वाजतां न लगे वारा ।
दिशा अंबरा शिवों नेदी ॥३॥
निळा म्हणे ऐसिये घरीं ।
निजविल वोंवरी पर्यकीं ॥४॥