पांडुरंगा न पाहती – संत निळोबाराय अभंग – ४५६
पांडुरंगा न पाहती ।
ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥
त्यांचे न व्हावें दर्शन ।
दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥
नायकावें त्यांचे बोल ।
विठ्ठल कृपेंविण फोल ॥३॥
निळा म्हणे करितीं कथा ।
अवघी पोकळ त्यांची वृथा ॥४॥
पांडुरंगा न पाहती ।
ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥
त्यांचे न व्हावें दर्शन ।
दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥
नायकावें त्यांचे बोल ।
विठ्ठल कृपेंविण फोल ॥३॥
निळा म्हणे करितीं कथा ।
अवघी पोकळ त्यांची वृथा ॥४॥