कणचि आले हे घनदाट । कणिसें ताट नाढळे ॥१॥ लुंगी भुस नाही कोंडा । पीक बहमांडा न समाये ॥२॥ सनकादिकां आणि देवां । पुरेसें मानवां प्राणिमात्रां ॥३॥ निळा म्हणे तिहीं लोकां । पुंडलिकें केला सुकाळ ॥४॥