पुजूनियां पुंडलिकें । चरण अवलोकिले निके ॥१॥ तोहि जाणतो महिमान । ह्रदयीं कवळिलें म्हणवून ॥२॥ शेष जाणे शयन झाला । पद्मे उमटलीं तो शोभला ॥३॥ निळा म्हणे कुरवाळितां । कमळा पावली अर्घांगता ॥४॥