पुजूनियां पुंडलिकें – संत निळोबाराय अभंग – ४५४
पुजूनियां पुंडलिकें ।
चरण अवलोकिले निके ॥१॥
तोहि जाणतो महिमान ।
ह्रदयीं कवळिलें म्हणवून ॥२॥
शेष जाणे शयन झाला ।
पद्मे उमटलीं तो शोभला ॥३॥
निळा म्हणे कुरवाळितां ।
कमळा पावली अर्घांगता ॥४॥
पुजूनियां पुंडलिकें ।
चरण अवलोकिले निके ॥१॥
तोहि जाणतो महिमान ।
ह्रदयीं कवळिलें म्हणवून ॥२॥
शेष जाणे शयन झाला ।
पद्मे उमटलीं तो शोभला ॥३॥
निळा म्हणे कुरवाळितां ।
कमळा पावली अर्घांगता ॥४॥