नेऊनियां बळी – संत निळोबाराय अभंग – ४५२
नेऊनियां बळी ।
जेणें घातला पाताळीं ॥१॥
तो हा देवांचाहि देवो ।
विटे उभा ठेवूनी पावो ॥२॥
शेषाचे शयनीं ।
होता निद्रित अनुदिनीं ॥३॥
निळा म्हणे करी ।
मंथन क्षीराचे सागरीं ॥४॥
नेऊनियां बळी ।
जेणें घातला पाताळीं ॥१॥
तो हा देवांचाहि देवो ।
विटे उभा ठेवूनी पावो ॥२॥
शेषाचे शयनीं ।
होता निद्रित अनुदिनीं ॥३॥
निळा म्हणे करी ।
मंथन क्षीराचे सागरीं ॥४॥