निरोप मागावया संत । आले राउळा समसत ॥१॥ चरणीं ठेऊनियां माथा । विनविती पंढरिनाथा ॥२॥ म्हणती कृपा असों दयावी । उपेक्षा आमपची न करावी ॥३॥ निळा म्हणे पंढरीनाथा । वियोग न साहे सर्वथा ॥४॥