निरोप मागावया संत – संत निळोबाराय अभंग – ४५१
निरोप मागावया संत ।
आले राउळा समसत ॥१॥
चरणीं ठेऊनियां माथा ।
विनविती पंढरिनाथा ॥२॥
म्हणती कृपा असों दयावी ।
उपेक्षा आमपची न करावी ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथा ।
वियोग न साहे सर्वथा ॥४॥
निरोप मागावया संत ।
आले राउळा समसत ॥१॥
चरणीं ठेऊनियां माथा ।
विनविती पंढरिनाथा ॥२॥
म्हणती कृपा असों दयावी ।
उपेक्षा आमपची न करावी ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथा ।
वियोग न साहे सर्वथा ॥४॥