नित्य निरामय सागरीं । मथन करुनी विचारशूरीं ॥१॥ कढिला नवनींताचा गोळा । तो हा विटेवरी सांवळा ॥२॥ जया तया लागे गोड । हरी क्षुघा अवघी चाड ॥३॥ निळा म्हणे दैवें हातीं । लागला जिहीं गाइला गीतीं ॥४॥