संत निळोबाराय अभंग

परी तें कर्म बळोत्तर – संत निळोबाराय अभंग ४५

परी तें कर्म बळोत्तर – संत निळोबाराय अभंग ४५


परी तें कर्म बळोत्तर ।
नेदी राहों वृत्ति स्थिर ।
झोंबोनियां विखार ।
आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥
मग म्हणे  वो सुंदर बाळ ।
यशोदे नागर हें वेल्हाळ ।
परि याचा जन्मकाळ ।
कैसा असेल पाहों तों ॥२॥
कृष्णपक्ष श्रावण मास ।
रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस ।
मध्यरात्रीचा जन्म यास ।
दशा तों क्रूर दिसताहें ॥३॥
जन्मकाळीं सर बारावा गुरु ।
शनी भोग हानिस्थानी स्थिरु ।
राहो केतु आणि दिनकरु ।
देशत्यागातें सुचिती ॥४॥
याचेन सकल वंश हानि ।
करील कुळाची बुडवणी ।
नये अवलोकु यातें नयनीं ।
टाकावा नेऊनि अरण्यात ॥५॥
यशोदे न लावी यासी उशीर ।
बाळ नव्हे हा मायावी खेचर ।
कालचि पाहेपां केला संहार ।
पेतनेचा क्षणही न लागतां ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि ऐंसे ।
मोडलें विंदान परमपुरुषे ।
जयाचें कर्म देखिलें जैसे ।
दिल्हे तया तैसे दानफळ ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

परी तें कर्म बळोत्तर – संत निळोबाराय अभंग ४५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *