जेणें आणियेली क्षिती ।
रसातळींहुनी वरती ॥१॥
तो हा उभा कृपावंत ।
ठेवुनी कटांवरीं हात ॥२॥
ज्याचे नाभीकमळींहून ।
जन्म पावे चतुरानन ॥३॥
निळा म्हणे कमळा नारी ।
ज्याचे चरणी वास करीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.