जें जें करिती तें तें वृथा । पंढरिनाथा न भजतां ॥१॥ दिसे पुढें परी तें माया । जाइल विलया क्षणमात्रें ॥२॥ पुत्र पत्नी बंधु पशु । भासे अभासु परि मिथ्या ॥३॥ निळा म्हणे वित्त गोत । नेणसी नाशवंत हें सकळ ॥४॥