नाना तर्के विचार केला । शेखीं राहिला नेणवेचि ॥१॥ तें हें निर्गुण निराभास । झालें रुपस विटेवरीं ॥२॥ वेद पुराणें नाना शास्त्रें । शिणली वक्त्रें वनितां ॥३॥ निळा म्हणे भक्तांसाठीं । उभा कर कटीं राहिला ॥४॥