नाना तर्के विचार केला – संत निळोबाराय अभंग – ४४७
नाना तर्के विचार केला ।
शेखीं राहिला नेणवेचि ॥१॥
तें हें निर्गुण निराभास ।
झालें रुपस विटेवरीं ॥२॥
वेद पुराणें नाना शास्त्रें ।
शिणली वक्त्रें वनितां ॥३॥
निळा म्हणे भक्तांसाठीं ।
उभा कर कटीं राहिला ॥४॥