नाना मतमतांतरें । वेद सुस्वरें स्तविती ज्या ॥१॥ तो हा येउनी पंढरिसी । भक्तांपाशी तिष्ठतु ॥२॥ जयालागीं आराधनें । योगयागांची साधनें ॥३॥ निळा म्हणे कथा कीर्ति । जया रुचे सत्संगती ॥४॥