न कळेचि अदृष्टाची गती – संत निळोबाराय अभंग ४३
न कळेचि अदृष्टाची गती ।
न कळे कर्माकर्माची संभूती ।
न कळे मृत्यूचीही रीती ।
कैशी घडवील कोण वेळ ॥१॥
न कळे कर्माकमाची संभूती ।
न कळे होणार तें बळीवंत ।
भोगणें भोगवील अकस्मात् ।
न कळे विधीचेंही लिखित ।
जें कां रेखियलें निढळी ॥२॥
कंसराव चिंताग्रस्त ।
उठुनी बैसला सभेआंत ।
प्रधान सेनाधिप समस्त ।
ग्लान वदनें भासती ॥३॥
पुढील विचार सुचितां ।
न सुचे कांहीची त्या तत्वतां ।
कृष्ण धाकेंचि त्याचिया चित्ता ।
धरचि कोठें न सांपडे ॥४॥
मग बोले कंसासुर ।
सेना सिध्द करा भार ।
जाऊनियां अति सत्वर ।
वधा हो कुमर नंदाचा ॥५॥
तंव ते म्हणती रायाप्रती ।
बळाची तेथें न चलें युकती ।
पहा ते पूतनेची शक्ती ।
इंद्रादिकांसी अलोट ॥६॥
निमिषमात्रें तिची शांती ।
ठेला करुनियां श्रीपती ।
तंव त्या माभळभट बोलती ।
नव्हे हें कार्य स्त्रियांचे ॥७॥
आम्हां ब्राम्हणांचे हे कृत्य ।
जाणे सकळांचेही घटित ।
दयाल आज्ञा तरी मी तेथें ।
जाऊनियां साधीन कार्यार्थ ॥८॥
निळा म्हणे बोलतां ऐसें ।
अवघे उल्हासले मानसें ।
म्हणती यथार्थ हे ऐसें ।
ऋषी बोलिले माभळ ॥९॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
न कळेचि अदृष्टाची गती – संत निळोबाराय अभंग ४३