घरोघरी हेचि कथा – संत निळोबाराय अभंग ४२
घरोघरी हेचि कथा ।
येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली थोंर चिंता ।
पूतनाबाई निमालिया ॥१॥
नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी ।
सांगती दासी त्या परिचारी ।
ऐका अपूर्व हे कथा ॥२॥
म्हणती स्तना लावितांची वदन ।
शोषियलें जीव प्राण ।
पूतना रडे आक्रंदोन ।
म्हणे धांव धांव ओढीं यशोदे ॥३॥
ओढितां न सुटचि शोषिली ।
मुकतपंथचि ते लाविली ।
अवघी देखानियां तेथ भ्यालीं ।
सेवकें आली पळोनियां ॥४॥
येउनी रायतें जाणवलें ।
पूतनाबाईतें बोळविलें ।
बाळे शोषूनियां घेतलें ।
परम आश्रचर्य हें वाटे ॥५॥
राया घरी दु:ख थोर ।
वाढलें झाला चिंतातूर ।
पुढे काय करील विचार ।
तें पाहावें नारीनर बोलती ॥६॥
निळा म्हणे यावरी आंता ।
अपूर्व आहे पुढील कथा ।
माभळभटासी गोकुळा जातां ।
होर्दल पूजा पिढीयांची ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
घरोघरी हेचि कथा – संत निळोबाराय अभंग ४२