स्नेह सरतां जैसा दीन । सूक्ष्म होतचि हारप । तयापरी बाईंचे स्वरुप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥ नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केलें निराकार । ऐसें देखोनियां सत्वर । आम्हीही निघालों तेथुनी ॥२॥ राया त्याची भेटी गोष्टी । न व्हावी तुम्हाही शेवटी । अकस्मात् झालिया राहाटी । करील पूतनाबाई सारिखी ॥३॥ ऐसें ऐकताचि श्रवणीं । राजा पडे मूच्छित धरणी । म्हणे गेली गेली रे मायबहिणीं । माझी पूतनेसारखी ॥४॥ महाबळें अति उत्कंठ मंत्रियांमाजी परमश्रेष्ठ । आता कायसी पाहों वाट । गेली नये त्या निजपंथें ॥५॥ मग रायातें संबोधून । प्रधान आणि नागरीक जन । म्हणती नव्हे भलें हे महा विघ्न । उदेलें देखत देखत ॥६॥ निळा म्हणे याहीवारी । श्रीहरिचरित्राची थोरी । अधिकें अधिक् ते कुसरी । परिसावी सज्जनीं सादर ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.