परात्परा सच्चिदानंदा – संत निळोबाराय अभंग ४
परात्परा सच्चिदानंदा ।
परिपूर्णा जी आनंदकंदा ।
जगदीशा विश्रवंद्या ।
विश्वव्यापका अनंता ।।१।।
भक्तवत्सला कृपासिंधु ।
तापत्रयहरणा दीनबंधु ।
तुझ्या नामी अगाध बोधु ।
भक्त पावती भाविंक ॥२॥
परमपुरुषा गुणातीता ।
अव्यया अक्षरा जी अव्यक्ता ।
विश्रवमंगळा रुक्मिणी कांता ।
पुंडलिकवरदा पंढरीशा ॥३॥
निरंजना निर्विकारा ।
निर्विकल्पा जगदोध्दारा ।
वेदवेदांतसागरा ।
विश्रवंभरा कल्पादि ॥४॥
भावाभावविवर्जिता ।
सगुणनिर्गुणा गुणातीता ।
निळया स्वामी कृपावंता ।
चरणी माथा तुमचिये ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
परात्परा सच्चिदानंदा – संत निळोबाराय अभंग ४