पुष्पवतीच्या संगमीं । नारद मुनीच्या आश्रमीं ॥१॥ विष्णू आपण क्रीडा करी । उमटलि पदें गोजिरि ॥२॥ गाई गोपाळ संगती । वेणुवादनाची प्रीति ॥३॥ निळा म्हणे वाटी काला । आपण मध्यें अवघ्या मुला ॥४॥