पुष्पवतीच्या संगमीं – संत निळोबाराय अभंग – ३९२
पुष्पवतीच्या संगमीं ।
नारद मुनीच्या आश्रमीं ॥१॥
विष्णू आपण क्रीडा करी ।
उमटलि पदें गोजिरि ॥२॥
गाई गोपाळ संगती ।
वेणुवादनाची प्रीति ॥३॥
निळा म्हणे वाटी काला ।
आपण मध्यें अवघ्या मुला ॥४॥
पुष्पवतीच्या संगमीं ।
नारद मुनीच्या आश्रमीं ॥१॥
विष्णू आपण क्रीडा करी ।
उमटलि पदें गोजिरि ॥२॥
गाई गोपाळ संगती ।
वेणुवादनाची प्रीति ॥३॥
निळा म्हणे वाटी काला ।
आपण मध्यें अवघ्या मुला ॥४॥