पाहा भूवैकुंठ पंढरी । धरिली सुदर्शनावरी ॥१॥ कैसा महिमा तो वर्णावा । जेथें वास विठ्ठल देवा ॥२॥ संतसनकादिक योगी । नित्य कीर्तन ठाकती ॥३॥ निळा म्हणे सात्विकजन । तरती पातकी पावन ॥४॥