संत निळोबाराय अभंग

पाहा भूवैकुंठ पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३९१

पाहा भूवैकुंठ पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३९१


पाहा भूवैकुंठ पंढरी ।
धरिली सुदर्शनावरी ॥१॥
कैसा महिमा तो वर्णावा ।
जेथें वास विठ्ठल देवा ॥२॥
संतसनकादिक योगी ।
नित्य कीर्तन ठाकती ॥३॥
निळा म्हणे सात्विकजन ।
तरती पातकी पावन ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाहा भूवैकुंठ पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *