सगुण स्वरुप तुमचें हरी । शोभेलें ते विटेवरी ॥१॥ तेणें लागली टकमक । डोळियां नावडे आणिक ॥२॥ मनाबुध्दीसीही भुलीं । इंद्रियें गुंफोनि राहिलीं ॥३॥ निळा म्हणे तनुप्राण । गेलीं आपणा विसरोन ॥४॥