वसती पायापाशीं – संत निळोबाराय अभंग – ३८८
वसती पायापाशीं ।
रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥
तो हा उभा कटीं कर ।
राहीरुक्माईचा वर ॥२॥
भुक्तिमुक्ती दासी वांटी ।
दर्शनेंचि फुकासाठीं ॥३॥
निळा म्हणे चिंतिती मुनी ।
ज्यातें ध्यानीं अनुदिनीं ॥४॥
वसती पायापाशीं ।
रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥
तो हा उभा कटीं कर ।
राहीरुक्माईचा वर ॥२॥
भुक्तिमुक्ती दासी वांटी ।
दर्शनेंचि फुकासाठीं ॥३॥
निळा म्हणे चिंतिती मुनी ।
ज्यातें ध्यानीं अनुदिनीं ॥४॥