माझा विठो नव्हेचि तैसा । उदारपणें ज्याचा ठसा ॥१॥ नामाचि एक स्मरल्यासाठी । गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥ भ्रष्ट अजामेळ दोषी । स्मरतां नेला निजधामासीं ॥३॥ निळा म्हणे सुदामदेवा । देउनी स्थापिलें निजवैभवा ॥४॥