ऐशी विठाई माउली । अनाथां कृपेची साउली ॥१॥ उभी असे निंरतर । ठेऊनियां कटीं कर ॥२॥ देउनी प्रेमाचें भातुकें । दासां अवलोकी कौतुके ॥३॥ निळा म्हणे महिमा इचा । वर्णिता कुंठित वेदवाचा ॥४॥