ऐशी विठाई माउली – संत निळोबाराय अभंग – ३८६
ऐशी विठाई माउली ।
अनाथां कृपेची साउली ॥१॥
उभी असे निंरतर ।
ठेऊनियां कटीं कर ॥२॥
देउनी प्रेमाचें भातुकें ।
दासां अवलोकी कौतुके ॥३॥
निळा म्हणे महिमा इचा ।
वर्णिता कुंठित वेदवाचा ॥४॥
ऐशी विठाई माउली ।
अनाथां कृपेची साउली ॥१॥
उभी असे निंरतर ।
ठेऊनियां कटीं कर ॥२॥
देउनी प्रेमाचें भातुकें ।
दासां अवलोकी कौतुके ॥३॥
निळा म्हणे महिमा इचा ।
वर्णिता कुंठित वेदवाचा ॥४॥