दिव्य तेज मुसावलें । विठ्ठल चरणीं तें राहिलें ॥१॥ झालें डोळियां पारणें । तनुमना भुलवणें ॥२॥ देवा दर्शनाची शिराणी । वाणी न पुरेचि त्या वदनीं ॥३॥ निळा म्हणे चरण चुरी । रमा नित्य निंरतरी ॥४॥