पांडुरंगा तुमची लिळा । विचित्र कळा जाणतीया ॥१॥ म्हणोनियां शरणांगत । देवहि अंकित ऋषि तुमचे ॥२॥ हत्कमळीं आराधिती । नित्य पूजिती दृढनिष्ठा ॥३॥ निळा म्हणे दर्शना येती । माना स्तविती स्तुतिवादें ॥४॥