पाहिजे तें समयीं देणें । नेदितां उणें पडों कोठें ॥१॥ ऐसा कृपेचा सागर । रमावर श्रीविठ्ठल ॥२॥ उपकार याचे आठवितां । न संडे चित्ता आनंद तो ॥३॥ निळा म्हणे भरोंसा झाला । संदेह फिटला मानसींचा ॥४॥