भक्ता भाग्य घरां आलें । उभेंचि ठेले सन्मुख ॥१॥ म्हणे विठ्ठल माझें नांव । सांगों गांव वैकुंठ ॥२॥ भेटावया तुम्हां आलों । निर्बुजलों वियोगें ॥३॥ निळा म्हणे पुंडलिका । भेटे सखा प्रीतीनें ॥४॥