संत निळोबाराय अभंग

भक्ता भाग्य घरां आलें – संत निळोबाराय अभंग – ३८१

भक्ता भाग्य घरां आलें – संत निळोबाराय अभंग – ३८१

भक्ता भाग्य घरां आलें ।
उभेंचि ठेले सन्मुख ॥१॥
म्हणे विठ्ठल माझें नांव ।
सांगों गांव वैकुंठ ॥२॥
भेटावया तुम्हां आलों ।
निर्बुजलों वियोगें ॥३॥
निळा म्हणे पुंडलिका ।
भेटे सखा प्रीतीनें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्ता भाग्य घरां आलें – संत निळोबाराय अभंग – ३८१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *