माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥ कुंडलांचे दीप्ती झळाळ । शोभलें निढळ बुक्यानें ॥३॥ निळा म्हणे अंगींचे कांति । सूर्यादि लोपती शशिमंडळें ॥४॥