विठ्ठल मूर्ति पाहतां दिठीं । पळती कोटी पापांच्या ॥१॥ मग तो आविर्भवे अंतरीं । दिसे बाहेरी चहूंकडे ॥२॥ दुजें येऊचिं नेदी आड । लपवी दुवाड मायाकृत ॥३॥ निळा म्हणे व्यापूनि दिशा । ठाके सरिसा दृष्टीपुढें ॥४॥