विठ्ठल मूर्ति पाहतां – संत निळोबाराय अभंग – ३७८
विठ्ठल मूर्ति पाहतां दिठीं ।
पळती कोटी पापांच्या ॥१॥
मग तो आविर्भवे अंतरीं ।
दिसे बाहेरी चहूंकडे ॥२॥
दुजें येऊचिं नेदी आड ।
लपवी दुवाड मायाकृत ॥३॥
निळा म्हणे व्यापूनि दिशा ।
ठाके सरिसा दृष्टीपुढें ॥४॥